नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने वेबिनारचे आयोजन
केंद्र सरकारच्या संसदेतील बहुमतापूर्वी झालेल्या ५३ व्या GST कौन्सिलच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. ही बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ज्यामध्ये सर्व राज्याचे अर्थमंत्री देखील उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या ५३ व्या GST कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी कायद्यातील कलम १६ (४) मधील इनपुट टॅक्स क्रेडिट, अँम्नेस्टी स्कीम इ. बाबत करदात्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून या विषयी राज्यातील कर सल्लागार, कर व्यावसायिकांना यांना सविस्तर माहिती अवगत व्हावी या उद्देशाने, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन शुक्रवार दि. ५ जुलै २०२४ रोजी दु. ४ वा. करण्यात येत असून पुणे येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट व जीएसटी कायद्याचे अभ्यासक, तज्ञ सीए स्वप्नील मुनोत हे प्रमुख वक्ते असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.