बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप
प्रतिनिधी :/ संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने भक्तांच्या सुविधेसाठी “पाणपोई आणि महिला सुविधा कक्षाचा” दिमाखदार उद्घाटन सोहळा दिनांक २० जून २०२४ रोजी दुपारी १ वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले, नाशिक पूर्व विधानसभा आमदार मा.श्री. राहुल ढिकले, आर.पी.आय. उत्तर महा. प्रमुख श्री. प्रकाशजी लोंढे, मनसे जिल्हाप्रमुख मा.श्री. अंकुश पवार , पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड साहेब यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. यावेळी भूषण लोंढे, संजय भामरे, महेश चव्हाण, शशी गरुड, मंगेश वाघमारे, देवाजी पाटील, अजिंक्य गीते, राजाभाऊ आढांगळे, संदीप पवार, सुमित घोटेकर, प्रथम पाटील, यश पाटील, अथर्व पाटील, समाधान ठोके, राहुल बोरिचा, संग्राम साळवे, हर्षल गरुड, रितेश सोनावणे, निलेश जोशी, आकाश मोहिते, मुन्ना राणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन संस्थानचे अध्यक्ष ॲड.प्रशांत जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सचिव ॲड. अक्षय कलंत्री यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमास संस्थान खजिनदार श्री. श्रीकांत राठी, उपाध्यक्षा सौ. श्रद्धा दुसाने कोतवाल, विश्वस्त श्री. सुनील पटेल, रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थान व्यवस्थापक श्री. सुनील शिनगाण, कर्मचारी गोकुळ शेवाळे, आशा केदारे, कविता मांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरचे वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर हे श्री. रामनाथ मालपाणी यांनी कपालेश्वर चरणी देणगी म्हणून दिले
.