सास-याने केला सूनेचा विनयभंग; गुन्हा दाखल

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक प्रतिनिधी /: सास-याने सूनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हि घटना मुंबई नाका परीसरात घडली असुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती असी की

घरात एकट्या असलेल्या सूनेचा फायदा घेत सास-याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला याबाबत विवाहीतेने पतीकडे घडलेला प्रकार सांगितला असता त्यानेही आपल्या वडिलांची बाजू घेत पत्नीस फोनवर शिवीगाळ करुन दमदाटी केली त्यानंतर महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. महिलेचा २०२२ मध्ये विवाह झाला. त्यानंतर ती सासरी नांदत असतांना ही घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत वेळोवेळी सास-याने तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पतीकडे घडलेला प्रकार सांगितला असता त्यानेही आपल्या वडिलांची बाजू लावून धरत पत्नीस फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत आहे

 


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *