प्रतिनिधी :/ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची घोषणा केलेली आहेत.त्यासाठी आज एक शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहेत. या शासन निर्णयामध्ये या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहेत, या योजनेसाठी अर्ज कसा करता येणार आहे, या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती आहे. या योजनेची अटी व शर्ती कोणती आहे, संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खालील प्रमाणे कागदपत्रे जमा करावे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे.
योजनेसाठी पात्रता
• लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.
• या योजनेसाठी विवाहित, घटस्फोटीत, विधवा व निराधार महिला यासाठी अर्ज करू शकता
• या योजनेसाठी 21 ते 60 या वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकता
• या योजनेसाठी महिलांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहेत व ते खाते त्यांच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहेत.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहेत.
यासाठी कोण अर्ज करू शकत नाही?
• ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहेत ते यासाठी अपात्र आहे
• ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी खाते मध्ये किंवा जॉब करत आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाहीत.
• ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना याचा लाभ मिळणार नाहीत
• या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र महिलेने याच्या आधी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसावा.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?
• लाभार्थी महिलेचे स्वतंत्र बँक खाते पासबुक
• महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
• कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला 2.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
• पासपोर्ट आकाराचे फोटो
• रेशन कार्ड
• आधार कार्ड
अर्ज प्रक्रिया कशी असणार?
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत.महिलांना यासाठी मोफत फॉर्म भरता येणार आहे ऑनलाइन अर्ज भरत असताना महिला समोर उपस्थित असणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे राज्य शासनामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून 1 जुलै 2024 पासून यासाठी
ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे.