आता व्हाट्सअप वर पण करता येणार परिसरात खड्डे, पाणी तुंबले तर नाशिक मनपा मध्ये कंप्लेंट
लोकेशनसह व्हाॅट्सॲप वर फोटो टाका व येणारी समस्या नोद करा: नाशिक मनपा
कॉल केल्यास नंबर ब्लॉक
नाशिक शहरामधील रस्त्यांवर पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले अथवा खड्डे पडलेले दिसून आल्यास त्यासंदर्भातील ठिकाण व लोकेशनची माहिती व्हॉट्सअॅप क्रमांक ७९७२१५४७९३ यावर छायाचित्रे व माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. व्हाट्सअॅपवर आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार असून, या क्रमांकावर कॉल करू नये, कॉल केल्यास सदर मोबाइल क्रमांक नंबर ब्लॉक केला जाईल, असा इशाराही मनपाच्या बांधकाम विभागाने दिला आहे.
नाशिक प्रतिनिधी /: पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी होण्यासह घरांमध्ये आणि सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरून नुकसान होत असते. त्याचबरोबर पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने वाहनधारकांना कसरत करतच मार्ग काढावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता बांधकाम विभागाने संबंधीत तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक देत त्यावर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन नाशिककरांना केले आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळा आणि खड्डे तसेच शहरातील विविध भागात रस्त्यालगत, चौकात तसेच सार्वजनिक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होण्याचे जणू काही समीकरणच झाले आहे. पावसाळ्यात शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेयुक्त बनत असल्याने वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा प्रकारची व्यवस्थाच मनपाकडून होत असल्याने वाहनधारकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी किमान यंदा मनपाच्या बांधकाम विभागाने व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करत नाशिककरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी असा प्रयत्न मनपाच्या बांधकाम विभागाकडून कधीच झाला नाही. दरवर्षी मनपाच्या बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याकरता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यानंतरही नाशिककरांची कधीच खड्ड्यापासून सुटका झाली नाही.