नाशिकच्या सुप्रसिद्ध चित्र सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांची गगन भरारी
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली त्यांच्या सूक्ष्म कलेची दखल
नाशिक दि ११ : प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या नाशिक पुण्यनगरीत अनेक रत्न उदयास आलेले आहेत, कवी कुसुमाग्रजांच्या या पावन भूमीतून अनेक नामवंत कलाकारांनी विविध कला गुणांच्या माध्यमातुन आपल्या नाशिकचे नाव साता समुद्र पार नेले असून, अजूनही नाशिक मधील काही रत्न आपल्या अंगी असलेल्या नवनवीन कलेच्या माध्यमातून साता समुद्रापार नेण्यांचे प्रमाणिक प्रयत्न करीत आहेत, अशातच नाशिक मधल्या एका ध्येय वेढ्या तरुणीची देखील आपल्या नाशिकचे नाव आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून साता समुद्रा पार नेले असून तिचे सर्व स्तरांतून तोंड भरून कौतुक केले जात आहे, डोळ्यांनाही दिसणार नाही अशा बारीक वस्तूंवरती व दैनंदिन जीवनातील आहारातील वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आकाराने लहान असणाऱ्या कड धान्यांवरती विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक स्तरातील व्यक्तींचे, देवी-देवतांचे व निसर्गाचे नयन रम्य हुबेहूब रंगीत चित्र कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता साकारत सर्वाँना आश्चर्याचा धक्का देत तिने आकाशाला गवसणी घातली आहे,
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य यांचे मावळे हे महाराजांची कलाकृती मोठ्यात मोठ्या वस्तूंवरती साकारून महाराजांना मानवंदना देत असतात, परंतु नाशिक मधील ऐश्वर्या औसरकर नामक ध्येयवेड्या तरूणीने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे रंगीत चित्र दैनंदीन आहारातील फोडणी साठी वापरण्यात येणाऱ्या व डोळ्यांनाही दिसणार नाही अशा एका बारीक राई वर – जिचे मोजमाप हे अवघे 1.40 मी मी असून त्या वरती कुठ्ल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता रंगीत चित्र काढून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे, असेच काहीस म्हणाव लागणार आहे, महत्वाची बाब म्हणजे औसरकर यांच्या अंगी असलेल्या सूक्ष्म कलेची दखल आपल्या देशातील नामांकित संस्था इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असून त्यांना कुठल्याही प्रकारची भिंगाचा वापर न करता सूक्ष्म चित्र काढणारी – पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून अधिकृत घोषणा संस्थेच्या अधीकृत संकेत स्थळावर करण्यात आलेली आहे, त्या संदर्भातील प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व मेडल त्यांना दि ०८.०८.२०२४ गुरुवार रोजी मिळाले आहे, त्यामुळे हा सर्व नाशिककरांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागणार आहे,
देशातील व बाहेरील देशातील अनेक सूक्ष्म चित्रकार हे चित्र काढत असताना विविध प्रकारच्या भिंगांचा वापर करत चित्र काढत असतात परंतु नाशिक मधल्या सूक्ष्म चित्रकार औसरकर यांनी कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चक्क 1.40 मी मी इतक्या सूक्ष्म राई वरती छत्रपती शिवरायांचे रंगीत चित्र साकारत आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे, त्या मुळे सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे, इतकेच नव्हे तर लंडनमधील प्रसिद्ध नामांकित संस्था वर्ल्ड वार्ड बुक ऑफ रेकॉर्ड ह्या संस्थेने देखील त्यांच्या ह्या कलेची दखल घेतली असून, भारतातील एकमेव व कुठ्ल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चित्र काढणारी पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून औसरकर यांच्या कलेची नोंद घेतली असून संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ वरती लवकरच नाव घोषित करणार असल्याचे औसरकर यांना मेल द्वारे कळविले आहे,
विशेषता सांगायचं म्हटलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हे आषाढी एकादशी निमित्त त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते त्यावेळी औसरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विठुरायाची उपमा देत दैनंदिन जीवनात जेवणामध्ये वापरण्यात येणाऱ्या अर्धा शेंगदाण्यावर राज ठाकरे यांचे रंगीत हुबेहूब चित्र काढून सर्व मनसे सैनिकांना सुखद धक्का दिला होता, त्यांच्या ह्या कलेचे कौतुक स्वतः राज साहेब ठाकरे यांनी देखील केले होते,
एवढ्यावरच न थांबता औसरकर यांनी आजपर्यंत दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे कडधान्य म्हणजेच मोहरी, तीळ, रवा, शेंगदाणा, साबुदाणा, मुंगडाळ, मठडाळ, राजमा अशा विविध प्रकारच्या कडधान्यांवरती विविध राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामधील नामवंत असणारे व्यक्तींचे हुबेहूब सूक्ष्मचित्र साकारून एक नवा विश्व विक्रम स्थापित केला आहे,
औसरकर यांनी आजपर्यंत पर्यंत अनेक विविध सूक्ष्म कड धान्य व सूक्ष्म वस्तूंवरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उप मुख्य मंत्री. अजित दादा पवार, उपुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी मंत्री छगनजी भुजबळ, मंत्री. दादाजी भुसे, मंत्री. आदित्य ठाकरे,
यांच्यासह नाशिक शहरातील लोक प्रतिनिधि आ. सीमा ताई हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. ढिकले, मा. आमदार अपूर्व भाऊ हिरे, आ. सुहास अण्णा कांदे, नाशिकचे मा. महापौर विनायक जी पांडे, यांच्या सह अनेक नामवंत कलाकारांचे व देव देवीतांचे चित्र काढून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे,
त्यामुळे नाशिक मधील अनेक नामवंत राजकीय सामाजिक शैक्षणिक व काही न्यूज चॅनल वाल्यांनी या तरुणीला अक्षरशः डोक्यावर घेतले असून सोबतच या तरुणीने देखील सर्वांच्या भावना जाणून घेत आपल्या नाशिकचे नाव शाखा समुद्रा पार जावे याकरिता थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले असून त्यांनी देखील तिच्या कलेची दखल घेत येत्या काही दिवसातच तिची परीक्षा घेणार असल्याचे सांगितले आहे विशेषता भारतातील व अन्य देशातील जेवढे काही सूक्ष्म कलाकार असतील यांनी सूक्ष्म कला साकारत असताना विविध भिंगांचा वापर करत असतात त्यानंतर ते चित्र काढत असतात परंतु नाशिकमध्ये ही तरुणे कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चित्र काढण्यात पटवित आहेत सोबतच तिने कुठल्याही ब्रिंगात कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता चित्र काढून दाखवल्यास बक्षीस देणे असल्याचे देखील तिने सांगितलेला आहे अशा या ध्येयवेडे त्वरित नाव ऐश्वर्या राजेंद्र अवसरकर असून ती नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात आपला आई-वडील व लहान मुलगा कबीर सोबत राहते विशेषता या तळणीच्या अंगी ही कला अगदी लहानपणापासूनच असल्याच्या त्याच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे, लहानपणापासूनच अगदी पाहिलीला असल्यापासूनच तिच्या अंगी चित्रकलेची आवड होती सोबतच नवनवीन स्पर्धांमध्ये तिने लहानपणापासूनच सहभागीत एक नंबर मिळवत असायची असे देखील त्याच्या आईने बोलताना सांगितले आहे, नाशिक शहरांमध्ये गणपती उत्सव असो दिवाळी असो की दसरा या विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये तिने प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन वेळोवेळी आपली कला सादर केली असून आपल्या कलेच्या माध्यमातून त्याने अनेक संस्था सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून बक्षीस मिळवले असून आत्तापर्यंत किमान शेकडोच्या वरती तिला बक्षिसे मिळाले आहेत, तिच्या अंगी असलेल्या कलेच कौतुक सर्व स्तरांतून केले जात आहे, एवढा मोठा सीक्रेट सुपरस्टार नाशिक मध्ये असताना देखील इतके दिवस का पुढे आला नाही अशी खंत देखील नाशिककरांनी बोलून दाखवली आहे, याबाबत खुलासा करताना औसरकर यांनी सांगितले की, काही वैयक्तिक व घरगुती कारणांमुळे आपल्या अंगी असलेली कला दाखवता आली नाही याची देखील खंत ऐश्वर्या औसरकर यांनी बोलतांना सांगितले आहे, परंतु येत्या काही दिवसातच नाशिक सह स्वतःचं नाव सातासमुद्रा पार नेऊन स्वकर्तृत्वावर नवीन विश्व निर्माण करण्याचं नवीन विश्व निर्माण करण्याचा आत्मविश्वास ऐश्वर्या अवसरकर यांनी बोलून दाखवला आहे.