५४ व्या जीएसटी कौन्सिलमध्ये हे झाले निर्णय, आरोग्य विम्यावरील कर कमी होण्यासाठी अजून पहावी लागेल वाट…

नाशिक बातमी न्यूज नेटवर्क/: नुकतीच जीएसटी कौन्सिलची मीटिंग संपन्न झाली यावेळच्या जीएसटी परिषदे दोन महत्वपूर्ण विषय चर्चेत होते. एक म्हणजे आरोग्य विम्यावरील जीएसटी दर कमी करणे व रू २००० पेक्षा कमी रक्कमेच्या ऑनलाईन (डेबिट व क्रेडिट कार्ड) ट्रांजेक्शन वर १८% इतकाल जीएसटी आकारण्यात यावा. आरोग्य योजनेवरील जीएसटी दर सध्या तरी कमी होणार नसून पुढील जीएसटी कौन्सिलमध्ये सर्वच विमा वरील जीएसटी दराबाबत विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.

५४ व्या जीएसटी कौन्सिलमध्ये घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय ज्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यावरही सहमती झाली आहे. नमकिन/स्नॅक्सवरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भरपाई /उपकर (Compensation Cess) मार्च २०२६ पर्यंत गोळा केला जाणार आहे ज्यामुळे मागील कर्जाची परतफेड होऊ शकेल.

या निर्णयांचा उद्देश कर दरांची सुसूत्रता आणणे आणि विविध क्षेत्रांवरील कर भार कमी करणे आहे अशी माहिती नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स चे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *