नाशिक प्रतिनिधी:/ काम आटोपून घरी जाण्यासाठी डीजे ऑपरेटरचे डीजे मालकाची रिक्षा घेण्यासाठी हिरावाडी येथील कमलनगरमध्ये गेल्यानंतर रिक्षात अगोदरपासून झोपलेल्या दोघा जणांना आवाज देत उठविल्याच्या कारणावरून डीजे ऑपरेटरला बांबूने मारहाण केली. तसेच धारदार कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना घडली.
याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी किरण बंडू पगारे याने दिलेल्या तक्रारीवरून दोघा अज्ञात हल्लेखोरांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या रविवारी (दि.८) पगारे हे डीजेचे काम आटोपून घरी जाण्यासाठी हिरावाडी कमलनगर येथे मालकाची रिक्षा घेण्यासाठी गेला होते.
रिक्षात दोघे जण अगोदरपासून झोपलेले होते. त्यावेळी पगारे याने दोघांना हाक देत उठविले. त्याचा राग आल्याने संशयितानी पगारे याला शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली. त्यानंतर कमरेला लावलेल्या कोयत्यासारख्या धारदार वस्तूने डोक्यात वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमीला जमलेल्या लोकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.