आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२४- २५ म्हणजेच कर निर्धारण वर्ष २०२५-२६ करीता आयटीआर फॉर्म १ व आयटीआर फॉर्म ४ ची एक्सेल युटिलिटी आवृत्ती जारी केली आहे. आता करदाते आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हे फॉर्म डाउनलोड करू शकतात.
याबाबतची अधिकृत माहिती आयकर विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. आयटीआर-१ आणि आयटीआर-४ साठी एक्सेल युटिलिटी आता उपलब्ध आहे.’ यामुळे करदात्यांना रिटर्न दाखल करणे सोपे आणि सुरळीत होणार आहे.

अध्यक्ष – नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
”आयकर पोर्टलवर आयटीआर दाखल करण्याची सुविधा सुरू झाली आहे तसेच रिटर्न दाखल करण्याची मुदत ३१ जुलै वरून १५ सप्टेंबर करण्यात आली ही आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, वार्षिक माहिती विवरणपत्र म्हणजेच AIS, TIS अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे, या मुदतवाढीमुळे करदात्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.”