नाशिक प्रतिनिधी /: माधुरी जाधव / नवीन सिडको येथील शिवशक्ती चौकात एका ५० वर्षीय शेजा-याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी या संशयितास अंबड पोलीसांनी अटक केली असून या इसमाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास बापूश्री पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी दि.२३ रोजी सुमारे दुपारच्या दरम्यान ही घटना घडली. संशयित इसम हा पीडितेच्या शेजारी आहे. रविवारी संशयिताने पाण्याची बादली भरून आणण्यास सांगितल्याने मुलगी पाणी घेऊन त्याच्या घरी गेली असता संशयिताने तिचा विनयभंग केला.
आणि याबाबत कोणाकडे या घटनेबाबत काही सांगितले तर तुला मारेल असा दम भरल्याने घाबरलेल्या मुलीने घरी जावून आपल्या कुटुंबियांकडे घडलेली घटना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला असून अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.