काका पुतण्याचा गंगेचे पाणी पूजाविधि साठी आणताना बुडून मृत्यू

नाशिक प्रतिनिधी /: वडांगळी, ता. सिन्नर येथील गोदावरी दारणा संगमाजवळ देवाचे पाणी आणताना सोनगिरीच्या मधूकर लहाने वय 48 व विठ्ठल गोरख लहाने वय 14 या दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी(ता.10) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.

काका पुतणे सकाळी सहाच्या सुमारास जोगलेटेंभीला गंगेचे पाणी आणण्यासाठी गेले. त्यानंतर विठ्ठल लहाने महादेव मंदिराजवळील गोदापत्रात अंघोळ साठी गेला. मात्र विठ्ठलचा घाटाजवळ पाण्याच्या वेगाने तोल गेला. त्यावेळी शिवनाथ लहाने यांनी विठ्ठलला वाचविण्यासाठी गोदावरी नदीत उडी घेतली.

सकाळी गंगेचे पाणी आणण्यासाठी गेलेले काका पुतणे परत आले नाही. त्यामुळे लहाने कुटुंब त्यांना शोधण्यासाठी संगमाकडे आले. त्यावेळी दोघांचे कपडे नदी किनाऱ्यावर दिसले त्यानंतर दोघेही गोदावरी नदी पात्रात बुडाल्याचे अंदाज आल्याने. त्यानंतर शोधकार्य सुरू झाले.

शोध मोहिमेच्या पथकाने दुपारी विठ्ठल लहाने आणि शिवनाथ लहाने यांचा मुतदेह गोदावरी पात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. सोनगिरीला दुपारी साडे चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *