भाजपने मंगळवारी किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियकु्ती केली होती. पण सोमय्या यांनी एका पत्राद्वारे हे पद नाकारले. भाजपचे काम करण्यासाठी मला कोणत्याही पदाची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितले तेव्हापासून आजपर्यंत मी पक्षाचे जीव लावून काम करत आहे. आपण सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे पक्षाचं काम करत राहणार. माझा निर्णय मी प्रदेशाध्यक्षांना कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सोमय्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु झाली आहे.