विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निर्देश देत योग्य ते उपाययोजना करण्याचे राज्यपाल यांनी दिले आश्वासन
नाशिक प्रतिनिधी: अध्यात्मिक, धार्मिक तीर्थस्थळ अशी ओळख असेलेले नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची बाब राज्यपाल राधाकृष्णन यांच्या नाशिक दौऱ्यात मनसेच्या पदाधिकार्यांनी यांनी भेट घेत यावर तातडीने उपाय योजना करून कारवाई करावी याबाबतचे निवेदन करण्यात आले. याप्रसंगी शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप, सौरभ खैरनार, अमित गांगुर्डे, महेंद्र डहाळे उपस्थित होते.
“नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी हा अत्यंत संवेदशील विषय होत चालला आहे. शहरातील अनेक गुन्ह्यात अल्पवयीन युवक असून त्यांना राजकीय शह मिळत आहे कि काय ? धार्मिक, अध्यात्मिक तीर्थस्थळ अशी ओळख असेलेले नाशिक शहरात गुन्हेगारीकरण वाढत आहे. या संदर्भात राज्यपाल राधाकृष्णन यांनी निवदेन देण्यात आले आहे” – प्रसाद दत्तात्रेय सानप (मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष तथा प्रभारी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ)