नाशिक | सातपूर | प्रतिनिधी /: सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील बुधवारी दि. २६ सायंकाळी च्या दरम्यान कामावरून दुचाकीने जाणाऱ्या तुषार रघुनाथ पवार वय वर्ष ३६ या युवकाचा झाड अगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. तुषार रघुनाथ पवार हे आपल्या मोटरसायकलने शिवाजीनगरकडून गंगावऱ्हे येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास जात असतांना हा अपघात घडला. यात ते गंभीर जखमी झाले, जखमी पवार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून पवार यांना मृत घोषित केले.घटना घडल्यानंतर घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली असता अग्निशमन दल तसेच त्यांचे कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतूक सुरळीत केली.