तीन दिवसांत ५० जणांवर कारवाई करत नियम पालनाचे आवाहन
प्रतिनिधी | नाशिक :/ वाढती गुन्हेगारी, अतिवेगाने वाहन चालवणे, अपघातांची मालिका हे प्रकार राेखण्यासाठी अंबड पाेलिसांकडून गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. यात वाहन, कागदपत्र तपासणी करण्यात आली. बुधवारी (दि. ९) सायंकाळच्या सुमारास झालेल्या कारवाईत १०० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. तर ३ दिवसांत ३०० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात येऊन ५० जणांवर कारवाई करण्यात आल्याचे अंबड पाेलिसांकडून सांगण्यात आले.
पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त माेनिका राऊत यांच्या आदेशानुसार, तसेच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाणे हद्दीत राबवण्यात आलेल्या या ‘स्टॉप अँड सर्च’ कारवाईत ई-चलनद्वारे चाैघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर विना कागदपत्रे, विना हेल्मेट, ट्रिपल सीट, रश ड्रायव्हिंग, काळ्या काचा, मॉडीफाय सायलेन्सर याची तपासणी शिवाजी चौकीचे बीट मार्शल पोलिस अंमलदार अशोक उगले, तुषार देसले यांनी केली. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक पवार यांनी केले आहे.