नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते मयुर प्रकाश अलई यांचा वाढदिवस खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते मयुर प्रकाश अलई यांचा वाढदिवस खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, क्षेत्रात कार्यरत असलेल्या मयुर अलई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले सामाजिक कार्यकर्ते मयुर अलई हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संस्था,संघटनांच्या माध्यमातून रक्तदान,अन्नदान,रुग्णसेवा,आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी विनामूल्य औषधे उपलब्ध करून देणे आदी सामाजिक कार्याबरोबरच एक डबा भुकेल्यांसाठी हा उपक्रम राबवित आहेत.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या मयूर अलई यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन थांबण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे व या निवडणुकीत अलई यांना संधी द्यावी, ते मतदारांच्या मनातील विकास नक्कीच घडवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी मयूर प्रकाश अलई यांनी आपल्या मनोगत शुभेच्छुक यांचे आभार मानले.

यावेळी भाजपाचे लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकर, जगन अण्णा पाटील,पालकमंत्री दादाजी भुसे यांचे स्वीय सहाय्यक महेंद्र पवार,श्रीधर तात्या कोठावदे, कैलास येवला, डॉ. येवलकर, डॉ. गिरासे,प्रशांत कोठावदे, पंकज ततार शरद काळे, सुदेश आहेर, अतुल अहिरे,सुरेश पाटील, दिलीप दातीर,रत्नाकर वाणी, योगेश बागरेचा,सुदेश खुले,प्रशांत पूरकर, उत्कर्ष वाघ, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय,कला, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधितज्ज्ञ, पोलीस, शासकीय अधिकारी, पत्रकारिता, विविध संस्था, संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी, समाजबांधव व हितचिंतकांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *