तीन दिवसांपासून जलवाहिनीला गळतीमुळे २ लाख हून अधिक लिटर पाण्याचा अपव्यय
तक्रारी करूनही दुरुस्ती काम नाही; नागरिक संतप्त
प्रतिनिधी | नाशिक
पाटीलनगर येथील नाईक मळा भागात गेल्या तीन दिवसापासून पाईपलाईन फुटल्याने दोन लाख लिटरहून अधिक पाणी वाया गेल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिकेचे सिडको विभागातील पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांच्याकडे सलग तीन दिवसापासून रहिवाशांनी तक्रार देऊनही अद्याप दुरुस्ती करण्यात ना आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य म्हणजे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक यांनी विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्याकडे तक्रार करूनही कुठलाही प्रतिसाद ना मिळाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकीकडे परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने १५ हजारहून अधिक नागरिकांना रोज पणी समस्येला सामोरे जावे लागत असताना अशा प्रकारे नासाडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.
नाशिक मध्ये व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्याः टिळकवाडी भागातील बंगल्यात दाम्पत्याने रात्री विष सेवन करून संपवले जीवन दोघा मुलांसोबत रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर…