मयूर अलई एक उमद् नेतृत्व….

मयूर अलई एक उमद् नेतृत्व….

 

नाशिक शहरात तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे सुटले आहे इच्छुक उमेदवारही आपापल्या कामाला लागल्याचे चित्र सध्या नाशिक शहरासह सिडकोत बघायला मिळत आहे.असे असताना एक उमद् नेतृत्व म्हणजेच मयूर प्रकाश अलई यांच्या नावाची चर्चा सिडको परिसरात म्हणजेच नाशिक पश्चिम विभागात जोर धरू लागली आहे मयूर प्रकाश अलई हे मुळगाव चे सटाणा तालुक्यातील नामपुर येथील आहेत म्हणजेच कसमादे भागातील मयूर अलई यांच्या वडिलांचे नामपुर येथे किराणा दुकानाचा व्यवसाय आहे सर्वसाधारण कुटुंबातील मयूर अलई हे 1999 मध्ये नाशिक शहरात शिक्षणासाठी आले त्यानंतर ते नाशिक मधील स्थायिक झाले.

डी फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2005 या वर्षी त्यांनी मेडिकल या व्यवसायाला सुरुवात केली व्यवसाय करता करता त्यांनी मेडिकल संदर्भात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले 2009 मध्ये केमिस्ट असोशियन या निवडणुकीसाठी उभे राहिले पहिल्यांदा उभे राहिलेले अलई निवडूनही आले व असोशियन चे अध्यक्ष झाले नाशिक शहरामध्ये त्यांचे दोन मेडिकल ही आहे कोरोना या भयंकर महामारीच्या काळात त्यांनी गोरगरीब जनतेसाठी लागणाऱ्या गोळ्या औषधांपासून तसेच ऑक्सिजन सिलेंडर बेड हे स्वखर्चातून अवेलेबल करून लोकांचे प्राण वाचवले तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधूनही अनेकांना निधीही मिळवून दिला मयूर अलई हे आधीपासूनच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

आज पर्यंत त्यांनी त्यांच्या पक्षाला तसेच मेडिकल असोशियन ला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही असे काम केले आहे मयूर प्रकाश अलई हे नाशिक पश्चिम मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे मला पक्षाने तिकीट दिले तर अहोरात्र जनतेसाठी झटेल असा विडा त्यांनी उचलला आहे साधारण कुटुंबातील आले नागरिकांच्या तळागाळातले प्रश्न जाणून घेतात त्यामुळे त्यांची एक प्रतिमा नागरिकांमध्ये उमटली आहे गरिबीची जाण असलेला मयूर अलई यांच्यासारखा नेता जर जनता जनार्दनाला मिळाला तर जनतेचे भाग्य उजळेल यात मात्र शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *