नाशिक | तपाेवन, साधूग्राम परिसरातील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा हाेत असल्याने या भागातील रस्त्यांवर हाेणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. शहर वाहतूक शाखेकडून शुक्रवारी (दि. ८) सकाळी १० वाजेपासून सभा संपेपर्यंत ११ मार्गांवर बदल करण्यात येऊन पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. सभेसाठी विविध जिल्ह्यांसह गावांतून येणाऱ्या नागरिकांसह अन्य वाहनचालकांनी बंदी असलेल्या मार्गांऐवजी पर्यायी वाहनांचा वापर करावा, निश्चित करून देण्यात आलेल्या १० वाहनतळांवरच वाहने उभी करावीत, असे आवाहन उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. हे निर्बंध पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहने, तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, अशी अधिसूचना पाेलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे.
—-
जाहिरात