Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली - नाशिक बातमी

करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली

विलंबित तसेच सुधारित आयटीआर १५ जानेवारी पर्यंत भरू शकतील.

नाशिक प्रतिनिधी/: प्राप्तिकर विभागाने विलंबित/सुधारित रिटर्न (Belated or Revised ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आतापर्यंत विलंबित/सुधारित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ होती, परंतु आता करदाते १५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांचे विलंबित/सुधारित रिटर्न भरू शकतील. या संदर्भात आयकर विभागानेही X वर पोस्ट करून निवेदन जारी केले आहे.

आतापर्यंत विलंबित/सुधारित आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ होती, परंतु आता करदाते १५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांचे विलंबित/सुधारित रिटर्न भरू शकतील. परंतु या मुदत वाढीचा फायदा केवळ निवासी वैयक्तिक करदात्यांना होणार असल्याची माहिती योगेश कातकाडे (कर सल्लागार) यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *