Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
थंडीचा कडाका पुन्हा जाणवणार, हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे - नाशिक बातमी

थंडीचा कडाका पुन्हा जाणवणार, हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे

नाशिक प्रतिनिधी /: वातावरणामध्ये बदल होत असून वातावरण आता कोरडे दिसत असून उत्तरेकडील भागाकडून थंड वाऱ्यांमुळे सोमवारपासून दि. ३० डिसेंबर नंतर थंडीचा जोर वाढणार आहे. रविवारी अफगाणिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाऱ्यामुळे काश्मीर भागात हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये किमान तापमान उणे ६ ते ७ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणामध्ये दाट धुके तयार झाले आहे. त्यामुळे आता ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.तसेच ३ ते ४ जानेवारी रोजी पुन्हा नवीन पश्चिमी चक्रावाऱ्याचा अंदाज असल्याने पुन्हा हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *