नाशिक सेवाभावी “दवाखान्याची दानपेटी” चे होतंय कौतुक! 

 ग्रुपच्या माध्यमातून ९ सदस्यांना वैद्यकीय आर्थिक मदत 
नाशिक प्रतिनिधी :/ दवाखाना म्हटलं कि प्रत्येक व्यक्ती समोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण होत असतो. कोणते हॉस्पिटल निवडावे, कुठे कमी खर्चात वैद्यकीय उपचार मिळतील अशा अनेक गोष्टींचा रुग्णाला सामना करावा लागत असतो. त्यातूनच दिवसेंदिवस हॉस्पिटल खर्चात होणारी वाढ, हॉस्पिटलचे मोठ-मोठे बील हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे. हीच गरज ओळखून प्रभाकर मानवतकर व नयन सावंत यांच्या संकल्पनेतून दहा-पंधरा लोक एकत्र येत “दवाखान्याचे दानपेटी ” या ग्रुपची स्थापना करण्यात आली. 
नाशिक येथील सेवाभावी ग्रुप ‘दवाखान्याचे दानपेटी’ या ग्रुपचा पहिला वर्धापन दिन २६ जानेवारी रोजी हॉटेल बनियन ट्री येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. सेवाभावी उद्देशाने कार्य करत असल्याने अल्प कालावधीत या ग्रुपने उत्तुंग भरारी घेत वर्षभरात १५५ सदस्य जोडले. ग्रुपमधील गरजू, अडचणीत सापडलेल्या सदस्यांना वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत हातभार देण्याचे कार्य केले जाते; जेणेकरून त्याच्यावरील आर्थिक संकट व योग्य उपचार घेण्यास मदत होते. याकरिता ग्रुप मधील प्रत्येक सदस्य प्रतिमहा आपआपल्या आर्थिक परिस्थितीनुसार योगदान देत जमलेल्या निधीतून ज्या सदस्यांना वैद्यकीय उपचार घेण्याकरिता आर्थिक मदतीची गरज असले त्यांना मदत केली जाते. आजवर या ग्रुपच्या माध्यमातून ९ सदस्यांना मदत झाली आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी विजय शिरसाठ सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयवंत कोठावदे, शशिकांत बर्वे, रिजवाना शेख, यमुना लिंगायत व हभप रत्नाकर शेलार महाराज यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी ग्रुपचे सदस्य नगरी धुमाकूळ मराठी कॉमेडी वेब सिरीजचे निर्माते श्री संजय जाधव सर यांनी ग्रुपच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पवार यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *