फ्लॅट च्या तुलनेत सिडकोच्या घरांच्या किमती जास्त
सिडको प्रतिनिधी:/ सिडको महामंडळाने सर्वसामान्य, कामगार लोकांकरीता सिडको वसाहत निर्माण केली. ही घरे ९९ वर्षाच्या भाडेपट्टा कराराद्वारे घरधारकांना हस्तांतरित करण्यात आली; परंतु वर्षनुवर्षं सिडको कडून आकारले जाणारे विविध वाढीव कर/चार्जेस यात प्रमुखाने बांधकाम चार्जेस, हस्तांतर शुल्क, इ. बंधनकारक अशा मोठ्या रक्कमेचा भरणा करावा लागत असल्याने सिडकोचे घर खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर जात असून लोक सिडकोच्या घरांपेक्षा फ्लॅट ला अधिक पसंती देताना दिसत आहे. तर याउलट सिडको च्या घरांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी घरे विक्री करून स्वतंत्र फ्लॅटचा सोयीस्कर मार्ग निवडताना दिसत आहे.
सिडको घर घरेदी करतांना सिडकोच्या विविध प्रकारच्या अनेक जाचक अशा अटी/शर्ती चे पालन करावे लागते याचबरोबर विविध कागदपत्रे ही तयार करावी लागत असल्याने खरेदीदारास मोठी रक्कम मोजावी लागते असे असताना बँका किंवा वित्तीय संस्था मात्र सिडकोच्या घरांसाठी कर्ज पुरवठा हा अतिशय कमी प्रमाणात व जास्त व्याज दराने करत असल्याचे दिसून येते त्यामुळे लोक आता सिडकोच्या घर खरेदीपेक्षा स्वतंत्र फ्लॅट ला अधिक पसंती देताना दिसत आहे.
“फ्री होल्ड हा मुद्दा केवळ राजकीय भांडवल”
प्रत्यक्षात महामंडळाकडून अनेक प्रकारच्या जाचक अटी शर्ती लादल्या जात असल्याने लोकांना घरच्या व्यवहारा संदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे प्रथम सिडकोच्या घरांबाबत लोकांच्या अडचणी सोडवून सदनिकांची योग्य नोंद करून शुल्क कमी केले तर खऱ्या अर्थाने सिडकोवासियांना समाधान मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी यांनी आक्रमक भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.
– कुणाल विलास धात्रक
सामाजिक कार्यकर्ते