नवीन नाशिक पत्रकार संघातर्फे जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना जीवनगौरव

नवीन नाशिक पत्रकार संघातर्फे जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना जीवनगौरव

सिडको विशेष प्रतिनिधी :- नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वा.
द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स हॉल, सिंचन भवन समोर, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, उंटवाडी रोड, नाशिक येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना एक लाखाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पत्रकार भूषण पुरस्कार चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता) प्रशांत कोतकर (दै. सकाळ), संजय शहाणे (दै. लोकमत), साई प्रसाद पाटील (दै.दिव्य मराठी), प्रवीण बिडवे (दै. मटा ), गौरव अहिरे (दै. पुढारी), वसंत आव्हाड (दै. पुण्यनगरी), फारुख पठाण (दै. देशदूत), अश्विनी पांडे (दै. गावकरी), मुकुंद बाविस्कर (भ्रमर), प्रशांत किरवे (दै. महानगर), मदन बोरसे (दै. नवभारत), प्रताप जाधव (दै. प्रहार ), दिनेश जाधव ( दै. लोकनामा), अजय भोसले (लक्ष महाराष्ट्र ), सुदर्शन सारडा (इंडिया दर्पण), विजकुमार इंगळे ( दै. सकाळ), दीपक भावसार (दै. महासागर) आदींना गौरविण्यात येणार आहे.
तर समाजभूषण पुरस्कार शिक्षण संस्थाचालक स्मिता चौधरी, डॉ. एस. एस. सोनवणे, सौंदर्य तज्ञ. डॉ. चंचल साबळे, डॉ. सत्यजित महाजन,डॉ. नितीन फरगडे, विधी तज्ञ अँड. राहुल कासलीवाल, ॲड. हिमिका शहा, ॲड. धिरज हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, मनोहर कारंडे व रामदास शेळके, माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, निसर्ग प्रेमी गोकुळ पाटील सामाजिक कार्यकर्ते बंडूशेठ दळवी, उद्योजक संदीप मांडवडे, उपसरपंच सदानंद नवले, पोलीस अधिकारी छाया देवरे, कविराज वाणी, गोरक्ष पुरुषोत्तम आव्हाड, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुगे आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. गिरीश महाजन, खा. राजाभाऊ वाजे, आ. सीमा हिरे, माजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ऊबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, वंचित महानगर प्रमुख अविनाश शिंदे, भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी पत्रकारांना सायकल व हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने कऱण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *