अशोकनगरला चहा टपरीत गॅस सिलेंडरचा स्फ़ोट; लाखोंचे नुकसान २५० मीटरपर्यंत बसला स्फ़ोटाचा हादरा

सातपूर प्रतिनिधी /: परिसरातील अशोकनगर येथे चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा स्वरूपातील टपरीत मंगळवारी (दि. २८) पहाटे सव्वा तीन वाजता सिलेंडरचा स्फोट झाल्याने लाखाेंचे नुकसान झाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार अशोक नगर शेवटच्या बसथांब्याजवळ एक रिक्षाचे रूपांतर चहाच्या टपरीत करत त्या ठिकाणी व्यवसाय करण्यात येत होता. चहा टपरी मालक २८ जानेवारी रोजी रात्री टपरी बंद करून गेल्यावर, पहाटे सव्वा तीन वाजेच्या दरम्यान टपरी मध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की, ते सिलेंडर उडून २५० मीटर लांब जाऊन पडले. या स्फोटामुळे शेजारी असलेल्या चायनीज व पाववड्यांच्या दुकानाचेही नुकसान झाले. व अडीचशे मीटर लांब असलेल्या मेट्रो सिरॅमिक या दुकानाचे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच जवळच उभ्या असलेल्या ईनोव्हा क्रेस्टा या गाडीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर स्फ़ोटा मुळे स्थानिक राहिवासी भयभीत झाले आहे. अशोकनगर परिसरात अतिक्रमण करत विनापरवाना व सुरक्षा नियम डावलून धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्था विक्री व्यवसाय होत आहे. मनपा अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *