सततच्या तांत्रिक अडचणीमुळे होणाऱ्या पाणी टंचाईने सिडकोवासीयांचे हाल
नाशिक प्रतिनिधी /: नवीन सिडकोतील अनेक भागा मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. या ना त्या अशा अनेक कारणामुळे सिडकोवासीयांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत. गणेश चौक लगतच्या परिसरात विस्कळीत व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु असतानाच दुसरीकडे मात्र अनेक भागात गढूळ, दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत असल्याने सिडकोत पाणी प्रश्नांनी नागरिक त्रस्त होत आहे. याबाबत नवीन नाशिक सिडको विभागीय कार्यालयात गणेश चौक, उत्तमनगर, अंबड लिंक रोड परिसरातून वारंवार तक्रारी केल्या जात आहे.
“अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे सिडकोतील नागिरकांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत असून सिडकोवासीयांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशींना उलट्या, मळमळ, पोट दुःखीच्या समस्या पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे, महापालिका प्रशासनाने तात्काळ योग्य त्या उपाययोजना करून नियमित स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा यापुठे जनआंदोन करण्यात येईल”
- कुणाल धात्रक (सामाजिक कार्यकर्ते)
सिडको, इंदिरानगर, पाथर्डी फाटा आणि पूर्व विभागात बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे जलशुद्धीकरण केंद्रातील स्टार्टर जळाल्याची आठवडाभरात सलग दुसरी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे सिडको, पाथर्डीसह पूर्व विभाग असा निम्म्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाथर्डी फाटा, इंदिरानगर सिडकोतील दत्त चौक, पवननगर, अंबड, गणेश चौकासह उत्तमनगर भागातील सकाळचा पाणीपुरवठा न झाल्याने रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले.