नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथील महाकुंभमेळा नियोजनाचा नाशिकच्या पथकाकडून अभ्यास

नाशिक प्रतिनिधी /: प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या पथकाने तेथील मेळाक्षेत्र, आखाडे, घाट आदींना भेटी देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. याशिवाय, या पथकाने तेथील अंतर्गत वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन स्वच्छता आदींबाबत राबविलेल्या उपक्रमांचीही पाहणी केली. नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी केली जात आहे. त्या अनुषंगाने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यास या पथकाने भेट देऊन पाहणी केली.

नाशिकच्या पथकात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. हे पथक सोमवारी (दि. १७) रोजी नाशिकहून प्रयागराज येथे रवाना झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *