महाशिवरात्र निमित्ताने श्री कपालेश्वर महादेव मंदिरा येथे जय्यत तयारी सुरु

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

भाविकांना १५ मी. दर्शनाचा लाभ होईल याकरिता संस्थानने केल्या विशेष उपाय योजना

नाशिक प्रतिनिधी/: येत्या बुधवारी (दि २६) रोजी महाशिवरात्र असल्याने पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार आहे. साधारण दीड ते दोन लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, मंदिराचे पवित्र ठेवून सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. 

संस्थानच्या वतीने बॅरीकेडींगच्या माध्यमातून भाविकांच्या रंगांचे नियोजन करण्यात येणार आहे. पहिल्या पायरीपासून महिला व पुरुष यांच्या एकेरी रांगा करण्यात येणार असून १५ मिनिटाच्या आत भाविकांच्या दर्शनाची सोय होईल असे नियोजन संस्थान कडून करण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या दर्शनासाठी शौनाकाश्रम प्रवेशद्वार क्र २ या बाजूने विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे. उन्हाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून पहिल्या पायरी पासून ते भाविक मंदिराच्या बाहेर पडेपर्यंत सर्व ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच संस्थान कार्यालयात प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी संस्थान व भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. ज्यात १२५ किलो साबुदाणा खिचडी, २५००० राजगिरा लाडू व केळी यांचा समावेश आहे.

संस्थानच्या वतीने भाविकांना महादेवास अभिषेक केलेले ५१,१११ रुद्राक्ष मोफत वितरीत करण्यात येणार आहे.सदरच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा व नाशिक महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांना संस्थांच्या वतीने निमंत्रण देण्यात आलेले आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे व गर्दीच्या नियंत्रणासाठी गरुडझेप करिअर अकॅडमीचे १०० स्वयंसेवक हे स. ८ ते दु. ४ व दु. ४ ते रात्री १२ अशा  दोन सत्रात कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थानचे ॲड. अक्षय कलंत्री विश्वस्त सौ. श्रद्धा कोतवाल- दुसाने, श्री. रावसाहेब कोशिरे, श्री. श्रीकांत राठी, श्री. मंडलेश्वर काळे, ॲड. प्रशांत जाधव, श्री. सुनील पटेल यांनी दिली आहे.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *