‘उपाध्यक्षपदी’ निवड झाल्याने विविध स्तरांवर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सुप्रसिद्ध कवियत्री, परिवर्तनवादी लेखिका, भाषा अभ्यास सौ. भाग्यश्री सचिन गुजर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाग्यश्री गुजर यांनी रेडिओ विश्वास, अहिल्यानगर आकाशवाणी, नाशिक आकाशवाणी, पुणे आकाशवाणी या केंद्रावर विविध कार्यक्रमात सहभागी होत आपल्या आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. साल २०२१ मधील ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांना कविता सादर करण्याची व सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती त्यांनी विविध राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेत विविध वृत्तपत्र मासिके साप्ताहिक यामध्ये त्यांनी विविध विषयांवर ललित लेख, कविता लिहिल्या आहेत.
