सिडको पाणीप्रश्नी मनपा पाणीपुरवठा अभियंताना घेराव

अनियमित पाणीपुरवठामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट

सिडको प्रतिनिधी/: नवीन नाशिक सिडको परिसरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. काही भागात अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तर काही ठिकाणी दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेकदा तक्रारी देऊनही त्याची दखल घेत नसल्याने आज नवीन नाशिक सिडको कार्यालयात विविध वार्डातील प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच मा नगरसेविका छायाताई देवांग यांनी विभागीय आयुक्त यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. फोनवरून संपर्क केला असता बऱ्याच वेळाने काही अधिकारी उपस्थित झाले तर काही अधिकाऱ्यांनी काढता पाय घेण्याची भूमिका घेतील. अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित लोकांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा मांडला. सातत्याने तक्रारी करूनही दखल का घेतली जात नाही तक्रारीचे निराकरण का केले जात नाही याबाबत विचारणा करण्यात आली.

माणसाचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा थेट अधिकाऱ्यांशी संपर्क केला जातो तेव्हा संबंधित अधिकारी हे उडवा-उडवी ची उत्तर देतात, चुकीची वागणूक देतात उलट तुमची नेहमीच सातत्याने कंप्लेटी असतात असे बोलले जाते. या सर्व कारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उठून आली असतात आज महानगरपालिका नवीन नाशिक सिडको येथील कार्यालयात आंदोलन करून प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी नवीन नाशिक मधील युवा नेते, ऍडव्होकेट, सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *