देवळाली पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांचा गाैरव

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

प्रतिनिधी :/  देवळाली कॅम्प येथील पोलिस ठाण्याच्या सर्व महिला अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांचा वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक मिताली कोळी यांना पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून तर इतर महिला अंमलदार यांना ठाणे अंमलदार, गोपनीय, क्राईम अशा विविध कामकाजाची जबाबदारी सोपवून विशेष सन्मान करण्यात आला. महिला होमगार्ड यांनाही भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देवरे यांसह अनिल पवार, राहुल बलकवडे,सह बबिता म्हसदे, सुजाता शहाणे, सविता धांडे, रोहिणी खकाळे, माधुरी सानप सह महिला पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *