सत्यमार्ग फाउंडेशन चा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

सत्यमार्ग फाउंडेशन चा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा

_विविध क्षेत्रात मान्यवर व्यक्तींना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित_

महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी व गरजू महिलानां त्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कार्यरत असलेली नाशिक येथील सत्यमार्ग फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन नाशिक येथील अवधुत स्वामी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान चिन्ह देत समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ….. यांनी संस्थेविषयी प्रस्तावना देतांना संस्थेचे आजवर केलेल्या कामकाजाची माहिती देताना सांगितले की, सत्यमार्ग फाउंडेशन हि नावाप्रमाणेच सत्याच्या मार्गाने वाटचाल करणारी संस्था असून महिला पदाधिकारी, कार्यकर्ता या निस्वार्थ पणे कार्य करत आहेत. संस्थेच्या वतीने आजवर अनेक अपंग, विधवा, घटस्फोटित व गरजू महिलांना मदत करण्याचे काम केले आहे. महिलांसाठी काम करत असताना समाजातील अनेक लोकांचे हातभार व पाठबळ लाभत असल्याने काम करण्याचा उत्साह वाढत आहे त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व यापुठे देखील अनेक समाजउपयोगी कार्य करण्याचा मानस असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजयोगिनी पुष्पा दिदी, पोपटराव जेजुरकर, करण गायकर, अनिल भडांगे, बाळासाहेब घुगे, अनिता भामरे, धनंजय बोडके, उमेश आटवणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *