३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला होणार सुरुवात; नाशिक अन् त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर..

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला होणार सुरुवात; नाशिक अन् त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर..

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत.
३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. २४ जुलै २०२८ पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे. या कुंभमेळ्यात ४२ ते ४५ पर्वस्नान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 आखाड्याचे महंत यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळाच्या नियोजन संदर्भात महत्वाची बैठक पार पडत आहे.
या बैठकीत कुंभमेळाच्या नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या..
कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा खालीलप्रमाणे-
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंभमेळाचे रामकुंडावर ध्वजारोहण होईल तेव्हा पासून कुंभमेळा पर्वा ला सुरवात होणार आहे.
२४ जुलै २०२८ पर्यत कुंभमेळा सुरू राहील.
कालावधी एकूण 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत आखाड्याचे साधू महंत स्नान करतील असे शाही स्नानाचे दिवस.

२४/७/२०२७ रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आखाडा चे ध्वजारोहण होणार आहे.

२९/७/२०२७ एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होणार आहे.

शाहीस्नान तारखा-

ऑगस्ट २०२७ सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले शाही स्नान होणार आहे.

३१ ऑगस्ट २०२७ श्रावण वद्य अमावस्या ला महाकुंभस्नान होणार आहे.

११ सप्टेंबर २०२७ ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या शाही स्नान म्हणजेच अमृत स्नान होणार आहे.

मुख्य पर्वकाळ असणाऱ्या ३१ ऑगस्ट २०२७ च्या दिवशी सूर्य चंद्र गुरू सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान केलें जाणार आहे.

यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे, यात गुरू हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो.

यंदा चा कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरू चे भ्रमण इतर राशीमध्ये होणार आहे. कोणत्या दिवशी गुरू कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती.

३१/१०/२०२६ गुरू सिंह राशीत प्रवेश
२४/१/२०२७ वक्री होऊन गुरू कर्क राशीत प्रवेश
२५/६/२०२७ गुरू सिंह राशीत प्रवेश
२६/११/२०२७ गुरू कन्या राशीत प्रवेश
२८/२/२०२८ गुरू सिंह राशीत प्रवेश
२४/७/२०२८ गुरू कन्या राशीत प्रबेश करत आहे.

कुंभमेळाचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ ला असल्याने सिंहस्थ कुंभमेळाच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याच्या शाही पर्वणी सुरु होऊन २४ जुलै २०२८ रोजी कुंभमेळा समाप्त होणार आहे.

 

 

जाहिरात

जाहिरात

 


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *