सिडकोत अतिक्रमण विभागाची कारवाई मनपा अतिक्रमण कर्मचारी व व्यावसायिक यांच्यात शाब्दिक वाद
सिडको प्रतिनिधी/
फुटपाथ व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीसह इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. याच बाबत अनेक तक्रारी होत असल्याने सिडकोतील त्रिमूर्ती चौक व उपेंद्रनगर परिसरात सिडको विभागीय कार्यालयाने कारवाई करत मंगळवारी (दि.६) रोजी सायंकाळी त्रिमूर्ती चौक व उपेंद्रनगर परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.
अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांची धावपळ उडाली. अनेकांनी किरकोळ विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र हा विरोध मोडीत काढून कारवाई करण्यात आली.
यावेळी उपेंद्र नगर भाजी मार्केट परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या हातगाडी व भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करताना मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व व्यावसायिक यांच्यात शाब्दिक वाद झाले. अतिक्रमित हातगाडा उचलण्यासाठी अतिक्रमण विभाग कारवाई करत असतानाच एका महिला व्यावसायिकाने थेट अतिक्रमण विभागाच्या गाडीसमोरच बसून विरोध दर्शविला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होता. मनपाने उपेंद्र नगर व त्रिमूर्ती चौक पेठे शाळेसमोरील हातगाडी व भाजी विक्रेत्यांच्या भाजीपाला व हातगाड्या वर कारवाई करत सुमारे चार ट्रक भाजीपाला जप्त केला.
अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड व विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत भाजीविक्रेते तसेच खाद्यविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. चार ट्रक साहित्य जप्त करून आडगाव गोदाम येथे जमा करण्यात आले. नवीन नाशिक विभागाचे अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे व प्रकाश नाठे सुनील हिरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत…
दिव्यांग बाळासाहेब घुगे यांचा प्रामाणिकपणा; सापडलेला मोबाईल केला परत सिडको प्रतिनिधी:/ भाजपा दिव्यांग आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे हे…