पत्रकार विलास ढाकणे यांना पितृशोक; माधवराव ढाकणे यांचे निधन
ओझे येथील रहिवाशी व दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक देशदूत चे ज्येष्ठ पत्रकार विलास ढाकणे व प्रगतिशील शेतकरी सुनील ढाकणे यांचे वडील माधवराव विठ्ठलराव ढाकणे (९०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कै. माधवराव ढाकणे यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. १० मे २०२५ रोजी ओझेगाव, ता. दिंडोरी येथे होईल.