🌦️ अवकाळी पावसामुळे नाशिककरांची तारांबळ ! अनेक ठिकाणी मोठे नुकसान
🌈 विजेच्या कडकडाट अनं वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी
वाढत्या तापमानामध्ये अचानकच (रविवारी) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या नारिकांना पावसामुळे काहीसा थंडावा मिळाला असला तरीही अवकाळी पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व व्यवसायिकांचे मोठी नुकसान झाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अवकाळी पावसाने नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अचानक तुफान पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक शहर, सिडको, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागांत पावसाने हजेरी लावली. शहरातील पावसाळी नाले, गटारी, ड्रेनेज तुडुंब भरल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. तर जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहनांचे, घरांचे मोठे नुकसान झालेले आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब रस्त्यांवर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचे संकट असू शकते असे हवामान खात्याने यासंदर्भात माहिती दिली
आहे.