प्रतिनिधी:/ पंचवटीत परिसरात दलित समाजविरोधी पत्रक तयार करून फेकल्याने शहरात तणाव पूर्ण वातावरण झाले होते, हा प्रकार पंचवटीत घडला असून नाशिक मधील विविध परिसरात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन रास्ता रोको करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वेळीच हस्तक्षेप केल्याने काहीशी तणाव सदृश्य परिस्थिती निवळली.
हिंदू युवा समितीच्या नावाने दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेले पत्रक राजवाडा परिसरात फेकून देण्यात आले. या पत्रकावरून परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर सर्व दलित समाज रस्त्यावर उतरला असून, नवीन नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ यांनी समस्त बौद्ध समाज, नवीन नाशिक यांच्या वतीने सदर घटनेचा जाहिर निषेध करण्यात करून अंबड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब यांची भेट घेत दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पत्रक वाटप करण्यात आलेल्या संबंधित व्यक्तीवर कडक कार्यवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.