श्री कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी केल्याला दानाच्या मोजणीस सुरवात…
मा. धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षणा खाली दानाची मोजणी
संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या दानपेट्या मा. धर्मादाय उप आयुक्त यांच्या आदेशा नुसार दर दोन महिन्यांनी मोजल्या जातात. सदरील मा. धर्मादाय उप आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक २० मे २०२५ रोजी सकाळी ११. ३० वाजता मंदिरातील पहिल्या व दुसऱ्या दानपेटीच्या मोजणीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक श्री. विलास. बी. पाटील यांच्या निरीक्षणमध्ये सदरील दानपेट्याचे सील उघडण्यात येऊन सदरील पहिली व दुसरी दानपेटी ही मोजणी करून पुन्हा सील करण्यात आली. यावेळी संस्थानचे ऍड. अक्षय कलंत्री, रावसाहेब कोशिरे, श्रीकांत राठी, व्यवस्थापक सुनील शिनगाण, गोकुळ शेवाळे, कविता मांडगे, आशा केदारे आदी उपस्थित होते. सदरील दोन्ही दानपेट्याची मोजणी मागच्या वेळेपेक्षा अडीच तास लवकर म्हणजेच साडे पाच तासाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.
सदरील दानपेटी क्र. १ मध्ये एकूण रक्कम ₹ ३,७३,८८६ /- प्राप्त झाली