प्रतिनिधी:/ युनिट दाेनच्या पथकाने दुकानदारांना गुटखा विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय पानटपरीचालकावर कारवाई करून त्याला अटक केलेली आहे. त्याच्या अधिक तपास केला असता त्याच्याकडे एक लाख चाळीस हजारांचा गुटखा हाती लागला असून याबाबत मुंबईनाका पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद माजीद सुफीयान खान मदिना चौक, सारडा सर्कल रोड, असे संशयित पानटपरी चालक व गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. खान हा पानस्टॉल चालक असून तो दुकानात राजरोसपणे प्रतिबंधित गुटखा विक्री करीत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अंमलदार वाल्मिक चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि. २३) पथकाने सारडा सर्कल रस्त्यावरील मदिना चौकात सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळ्यात अडकला. पोलीसांनी त्याचे अधिक चौकशी केली असता त्याच्या घरात सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.