छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापनातील गुरु;
राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी:/ गेल्या ४४ वर्षापासून तिडके कॉलनी येथील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र संस्थेने यशस्वीरित्या वाटचाल करत अनेक विद्यार्थी घडविले असून ही संस्था ४५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वा. “व्यवस्थापनातील गुरु छत्रपती शिवाजी महाराज” याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून डॉ. प्रा. प्रमोदकुमार शिवाजीराव हिरे (एच.पी.टी आर्टस आणि आर. वाय. के. सायन्स कॉलेज) हे लाभले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र या संबंधीचे ज्ञान, दूरदृष्टीकोन हे आज समाजाला अवगत व्हावे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समाजासमोर टिकून राहावा म्हणून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सदरील विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विनायक येवले यांनी दिली तर महत्वपूर्ण अशा विषयावरील व्याख्यानाचा लाभ संस्थेचे सर्व सभासद, विद्यार्थी, प्रशिक्षक व पालकवर्ग यांनी घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन सचिव सीए प्रवीण कुलकर्णी व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
जाहिरात

जाहिरात