आयकराची नोटीस येण्याआधीच प्राप्तिकर रिटर्न भरा – सीए डॉ.दिलीप सातभाई यांचे आवाहन

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

प्राप्तिकर रिटर्न मध्ये उत्पनाचे सर्व स्रो दाखवा

नाशिक प्रतिनिधी:/करदात्यांचे रिटर्न दाखल करण्यापूर्वी त्यांनी कमावलेले उत्पन्न अथवा विविध स्रोत्राद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न याबद्दलची अचूक माहिती घेऊन, आपलं आयकर विवरणपत्रक दाखल करण्यासाठी कोणता फॉर्म योग्य आहे याचे निकष लावणे अतिशय महत्त्वाचे आहे. उत्पन्नाच्या स्तोत्रानुसार नुसार प्राप्तिकर रिटर्नच्या फॉर्मची निवड न केल्यास किंवा चुकीचे रिटर्न भरल्यास ते रिटर्न आयकर विभागाकडून रद्द केले जाऊ शकते व याचा नाहक त्रास संबंधित करदात्याला होऊ शकतो. भविष्यातील अशा कोणत्याही प्रकारच्या कारवाई किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कर सल्लागार यांनीसुद्धा, करदात्यांच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत स्पष्टपणे नमूद करून योग्य फॉर्म ची निवड करूनच प्राप्तिकर रिटर्न दाखल करावे अशी माहिती सीए डॉ.दिलीप सातभाई यांनी दिली.

आयकर कायद्यातील “क्लिष्ट बाबी व विवरणपत्रकाचे सुधारित फॉर्म्स ” याविषयी नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स, अहिल्यानगर टॅक्स असोसिएशन व नाशिक चॅप्टर ऑफ आयसीएमआय च्या संयुक्त विद्यमाने “प्राप्तिकर रिटर्न बाबत” ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी ते बोलत होते. याविषयी अधिक माहिती देताना सीए डॉ.दिलीप सातभाई यांनी सांगितले की, आयकरातली करसवलत, करपात्र उत्पन्न व आयकर कलमातील विविध तरतुदीचे अचूक ज्ञान प्राप्त करून घेणे ही काळाची खरी गरज आहे. यासाठी कर सल्लागारांनी आयकर कायद्याविषयी तत्पर राहावे. करदात्यांचे रिटर्न दाखल करण्यासाठी त्यांच्या उत्पनानुसार सुयोग्य निकष लावले पाहिजे, जेणेकरून ते रिटर्न अनिवार्य आहे किंवा ऐच्छिक आहे हे समजते. याचबरोबर भविष्यात आयकर नोटीस येणार नाही यासाठी वेळेतच प्राप्तिकर रिटर्न दाखल करणे कधीही चांगले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सीएमए धनंजय जाधव चेअरमन नाशिक चॅप्टर ऑफ आयसीएमआय

आयकर कायद्याविषयी अद्यावत माहिती असणे काळाची गरज

“प्राप्तिकर रिटर्न दाखल करताना आयकर कायद्यातील विविध तरतुदी, भांडवली नफा, कर सवलती, कर कपात तसेच नवीन सुधारित आयटीआर फॉर्म अशा सर्व प्रकारच्या बाबींबाबत अद्यावत माहिती असणे ही काळाची गरज आहे अशा प्रकारच्या वेबिनारमुळे सीएमए व कर सल्लागारांना अधिक अचूक पणे काम करणे सोपे होणार आहे”.

यावेळी सीए विपुल भावसार यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी सीए हेमंत डागा यांनी परिचय करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा भामरे व आभार प्रदर्शन अंबादास गाजुल यांनी केले. वेबिनार साठी नाशिक शहरासह, मुंबई, पुणे, धुळे, जळगाव सह गोवा, कोल्हापूर अशा विविध शहरातून मोठ्या प्रमाणावर कर सल्लागारांनी सहभाग नोंदविला.

 

नितीन डोंगरे
अध्यक्ष – नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

करसल्लागार सदस्यांना कर कायद्यातील अद्ययावत माहिती प्रदान करण्यासाठी कटिबद्ध 

“आयकर विवरण पत्रकाच्या बाबतीत करदात्यांनी माहिती अर्धवट माहितीच्या आधारे विवरणपत्र दाखल केल्यास भविष्यात त्यांना नोटिसा, दंड, किंवा अन्य कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे कर सल्लागारांची जबाबदारी अधिक महत्त्वाची बनते. या दृष्टिकोनातून  प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष करासंबंधी वेळोवेळी सेमिनार, वेबिनार च्या माध्यमातून करसल्लागार सदस्यांना कायद्यातील नवनवीन बदलांबाबत अवगत करून देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने सात्यत्याने करत आहोत.  भविष्यात असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण उपक्रम राबवत राहण्याची आमची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करतो.”

जाहिरात

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *