नाशिक येथे रविवारी राष्ट्रीय कर परिषद “ज्ञानदीप”

नाशिक येथे रविवारी राष्ट्रीय कर परिषद “ज्ञानदीप”

नवीन नाशिक प्रतिनिधी – कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, व व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण एक दिवसीय राष्ट्रीय कर परिषद ज्ञानदीप चे रविवार दि13 रोजी सकाळी 8ते सायंकाळी 5:30 या वेळेत गोविंद नगर येथील हॉटेल फोर पॉईंट्स येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कर परिषद मध्ये कर क्षेत्रातील नामवंत वक्ते अॅड.दिपक बापट,सीए संजय वनबट्टे,प्रकाश पटवर्धन आदी मार्गदर्शन करणार आहेत.या परिषदेमध्ये जीएसटी व आयकर क्षेत्रातील ताज्या बदल,नविन सुधारणा,केस स्टडीज व व्यावसायिक दृष्टीकोनातून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कर परिषेदेचे आयोजन नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशन, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशन, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन,ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, जीएसटी प्रॅक्टिशनर्स ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीय संस्थांनी केले आहे.परिषेदेचे अध्यक्षपदी नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशनचे संस्थापक, अध्यक्ष अनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.या परिषदेस विविध संस्थांचे प्रमुख सचिन गांधी, संतोष गुप्ता,नितीन फिरोदिया,नितीन डोंगरे, महेश मडखोलकर,अनुरुद्र चव्हाण,नरेद्र सोनवणे आदीच्या प्रमुख उपस्थिस्तीत होणार आहे. या परिषेदेत जीवन गौरव पुरस्कार,नाशिक येथील सीए संजय मुथा यांना व युवा कर सल्लागार पुरस्कार नयन निराळी याना प्रदान करण्यात येणार आहे. परिषेद यशस्वी करण्या साठी प्रशांत उशीर,सुनील देशमुख,पंकज भामरे, प्रकाश विसपुते,नयन निराळी,चेतन पाटील, कमलेश सानप,सचिन येवलेकर आदी विशेष परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *