मधुमेहाचे योग्य नियोजन केल्यास समस्या टाळणे शक्य: डॉ नागेश अघोर
नाशिक: भारतात मधुमेही व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने देश मधुमेहाची जागतिक राजधानी झाले आहे.मधुमेहामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक गंभीर स्वरूपाचे संसर्गजन्य आजार उद्भवण्याची समस्या वाढत आहे. मात्र मधुमेहाचे योग्य नियोजन केल्यास या समस्या टाळता येतील असे प्रतिपादन नाशिक डायबेटिस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ नागेश अघोर यांनी केले.ते रविवारी नाशिक येथे झालेल्या मधुमेह परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. नाशिक डायबेटिस असोसिएशन (एन डी ए) व असोसिएशन ऑफ फिजिशियन,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद झाली. यावेळी मधुमेही व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या विविध संसर्गजन्य रोगांविषयी देशभरातील तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास एन डी ए चे उपाध्यक्ष डॉ नितीन घैसास, सचिव डॉ दीपेंद्र चौधरी,खजिनदार डॉ पुष्करनी देसाई , ए पी एन चे अध्यक्ष डॉ समीर चंद्रात्रे, सचिव डॉ प्रीतम अहिरराव ,ज्येष्ठ फिजिशियन डॉ ए के पवार, डॉ अजित कुमठेकर, डॉ मृणालिनी केळकर आदी उपस्थित होते. पी जी विद्यार्थ्यांकरिता आयोजित स्पर्धेचे डॉ अमित सेहगल व डॉ पार्थ शाह नियोजन केले. डॉ. क्षमा अघोर यांनी गणेश वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रेश्मा घोडेराव, डॉ भाग्यश्री पाटील,आहार तज्ञ क्षितिजा गायकवाड,पूजा शिरभाते, मंजिरी जोशी यांनी केले.
