धर्मादाय सह आयुक्त यांचे देवस्थानं, सेवाभावी संस्थांना आवाहन! विचारविनिमय करण्यासाठी बोलावली बैठक

धर्मादाय सह आयुक्त यांचे देवस्थानं, सेवाभावी संस्थांना आवाहन! विचारविनिमय करण्यासाठी बोलावली बैठक

नाशिक प्रतिनिधी:/ महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असुन त्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक न्यासांचे हे कर्तव्य असुन त्यादृष्टीकोणातून नाशिक विभागातील देवस्थान तसेच सेवाभावी संस्थांनी एकत्रित येउन मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी नाशिक विभागाचे धर्मादाय सह आयुक्त विवेक सोनुने यांच्या मुख्य उपस्थितीत मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०२.३० वाजता विश्वस्त प्रतिनिधींची बैठक होत आहे. धर्मादाय सह आयुक्त महावीर जोगी, उप आयुक्त प्रणिता श्रीनिवार,सहायक आयुक्त मोताळे पोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल.
सदरची बैठक श्री कालिका देवी मंदिर जुना आग्रा रोड, नाशिक येथील श्री कालिका माता सभागृहात होईल.

नाशिक जिल्हा देवस्थान विश्वस्त समिती व ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोशिएशन यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी धर्मदाय सहआयुक्त कार्यालय, नाशिक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *