गरुड झेप प्रतिष्ठान सुरक्षा व पर्यावरण अभियानात अग्रेसर!

सातत्यपूर्ण 2800 दिवस सातत्याने केला 22 वा जागतिक विक्रम

नाशिक (प्रतिनिधी): गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन, गोदावरी स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2800 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे. 25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे. याचे 22 जागतिक विक्रम झाले आहेत. रायझिंग स्टार इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, ब्राहो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यामध्ये नोंद झाली आहे. आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2800 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – संगीता भानोसे , संकेत भानोसे, अविनाश क्षीरसागर, अजिंक्य तरटे, सागर बोडके ,अंजली प्रधान, रेणू भानोसे, अमोल व राम अहिरे अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत.

तसेच सॅटर्डे संडे सायकलिस्ट परिवारातील दत्तू मामा टिळे, डॉ संदीप भानोसे, प्रतापराव पाटील, शेखर खर्डे, अनिल वराडे, तृप्तीदा काटकर, मेघा सोनजे, अपर्णा भोगावकर, दिलीप भांड, कोंडाजी कांदळकर, सुदाम अथरे, वसंत गवांदे, चंद्रशेखर शिंदे, सचिन मालवे, सुरेश सनेर, हेमंत शिंदे, रामदास इद्धाते व गोविंद शिंदे अभियानात सामील होते.
पुढील टार्गेट सातत्यपूर्ण 3 हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *