पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन

सिडको प्रतिनिधी :/ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा सिडको मंडळ च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला. सर्व दिव्यांग बांधवांनी मोदीजी ना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या व मोदीजी मुळेच अपंग शब्द जाऊन दिव्यांग शब्द मिळाला अशी भावना बाळासाहेब घुगे यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना राबविल्या जात असल्याचे ही त्यांनी यावेळी म्हटले.
या कार्यक्रमास न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे, मा नगरसेविका छाया ताई देवांग, शितल ताई भामरे, मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, रवी पाटील, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रकाश चकोर, राजेंद्र जडे, प्रविण सोनवणे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा छाया ताई परेवाल, युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहन कानकाटे, कायदा आघाडीचे अध्यक्ष ॲड सागर कडभाने, डी बी राजपूत, परमानंद पाटील, उत्तम काळे, रंगनाथ दरगुडे, बी के नागरे सर, सागर जैन, राहुल सदाफळे साहेबराव कांगणे आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब घुगे यांनी केले होते.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *