उमेदवारी दाखल करायला कागदपत्रे जमवाजमवी करणा-या भाजप पदाधिकाऱ्याला धक्काच…
नाशिक : महानगरपालिका निवडणुकांमुळे शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. इच्छुकांची भाऊगर्दी, प्रचारयोजना आणि मतदार याद्यांची चाचफड अशा पार्श्वभूमीवर नवीन नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या एका अजब-गजब चुकीने प्रशासनाचा कारभार उघडा पडला आहे. जिवंत असलेला भाजप पदाधिकारीच मतदार यादीत “मयत” दाखवण्यात आल्याचे समोर आले असून, या घटनेने निवडणूक आयोगाच्या दुर्लक्षावर मोठा वादंग निर्माण झाला आहे!
काय आहे प्रकरण?
नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवार असलेले
उत्तम अर्जुन काळे (उपाध्यक्ष – सिडको भाजपा मंडळ-1)
हे आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मतदान यादी तपासायला गेले.
त्यावेळी… कुटुंबातील सर्वांची नावे यादीत पण फक्त त्यांचेच नाव गायब! शंका आल्याने विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली असता अभूतपूर्व माहिती उघड झाली. उत्तम अर्जुन काळे हे मयत आहेत आणि त्यांचे वास्तव्य मतदार संघ 123, मखमलाबाद येथे नोंद आहे!”
हे ऐकून उपस्थित अधिकारीही काही क्षण अवाक् झाले! कारण जे स्वतः कार्यालयात ओळखपत्रासह उभे होते… त्यांनाच नोंदीत ‘मयत’ दाखवले गेले होते!
ही बाब गंभीर असून याबाबत सकोल चौकशीचे करण्यात येईल. यामध्ये जो कोणी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिवंत असताना मतदानापासून वंचित?
या चुकामुळे काळे यांना मतदानाचा हक्कच नाकारला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यांची उमेदवारी देखील या चुकीमुळे धोक्यात येऊ शकते.
लोकांमध्ये संताप: “जर भाजपच्या पदाधिकाऱ्याचीच नोंद ‘मयत’ दाखवली जाते
तर सामान्य मतदारांचं काय होत असेल?”
मतदारांचा आक्रोश, प्रशासन सवालाखाली!
निवडणुकीच्या तोंडावर अशा भलत्याच चुका, त्यातही जगता-भिरता व्यक्तीला मरणोत्तर मतदानाची नोंद यामुळे नागरिकांमध्ये तुफान चर्चा सुरू आहे.
▪️ निवडणूक आयोगाची माहिती तंत्रज्ञान प्रणाली धोकादायक?
▪️ कोणी तरी मुद्दामून नाव गाळले का?
▪️ इच्छुकांना रोखण्यासाठी राजकीय डाव??
“हे मी आहे की माझं भूत?” काळेंचा सवाल
“मी हयात असून स्वतः कार्यालयात असताना मला मयत दाखवणं…
हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही!”
उत्तम काळे, उपाध्यक्ष – सिडको भाजपा मंडळ-1
लोकांचे प्रश्न थेट आयोगाला
🔹 नाव कुठे येणार?
🔹 कधी गायब होणार?
🔹 जिवंत असताना मृत घोषित केलं, तर विश्वास कोण ठेवणार? नागरिकांचे विषण्ण उद्गार “मतदार यादीत आपला जीव गृहीत धरून चालावं काय?”
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कामकाजाला या घटनेने मोठा चाप बसला आहे. आगामी मतदानात आणखी किती जणांना “मृत” घोषित केलं जाईल? हा मोठा प्रश्न नागरीकांना सतावत आहे!