पवन नगर शाखा सल्लागारपदी निवड
नवीन नाशिक (वा.) : दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पवन नगर शाखेच्या शाखा सल्लागारपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपशहराध्यक्ष सुनील घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच सभा संपन्न झाली. या सभेत पवन नगर शाखा सल्लागारपदी सुनील दामोदर घुगे यांची निवड जाहीर करण्यात आली. बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड, व्हॉ चेअरमन मनोहर कराड ज्येष्ठ संचालक निवृत्त आरिंगळे, सुधाकर जाधव, सुनील आडके व इतर सर्व संचालक यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.