मंगेश ताकाटे,
नाशिक (प्रतिनिधी): डी.जी.पी. नगर–२ परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात काल ‘गणेश जयंती’ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रभाग क्रमांक २८ मधील विद्यमान नगरसेवकांनी आवर्जून उपस्थिती लावून बाप्पाचे दर्शन घेतले.
या मंगलमयी प्रसंगी प्रभाग २८ चे नगरसेवक शरद हरिभाऊ फडोळ, दीपक दातीर, सुवर्णा मटाले आणि प्रतिभा पवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला आणि गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापन आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि उपस्थितीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व सत्कार सोहळा साजराही झाला. “श्री गणरायाचे आशीर्वाद आपल्या प्रभागावर आणि सर्व नागरिकांवर सदैव राहोत,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.