बिजाबाई बाबुराव पागेरे यांचे वयाच्या ९५व्या वर्षी दुःखद निधन
नाशिक (प्रतिनिधी): शेतकरी कुटुंबातील पागेरे परिवाराचे एका छोट्याशा रोपट्यातून वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या, कष्ट, त्याग आणि संस्कारांची शिकवण देणाऱ्या कै. बिजाबाई बाबुराव पागेरे यांचे मंगळवार, २९ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या नाशिक जिल्हा महानुभाव समितीचे उपाध्यक्ष पंडितराव पागेरे यांच्या मातोश्री तर ICMAI नाशिक चॅप्टरचे माजी चेअरमन सीएमए. भूषण पागेरे यांच्या आजी होत. कुटुंबवत्सल स्वभाव, परिश्रमाची शिदोरी आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्या परिसरात आदराने ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाने पागेरे परिवारासह नांदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दशक्रिया विधी:
शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी
स्थळ: पागेरे मळा, अस्वली–नांदगाव रोड,
नांदगाव बुद्रुक, ता. इगतपुरी, जि. नाशिक
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पागेरे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.